कीर्तन म्हणजे करमणूक समजलात काय?; तुकाबांचे वंशज इंदुरीकरांवर भडकले

माळशिरस | ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकारांच्या वक्तव्यावरुन संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संमेलाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी इंदोरीकरांवर सडकून टीका केली आहे. ते नातेपुतेमधील वारकरी कीर्तन संमेलनात बोलताना त्यांनी इंदोरीकरांवर निशाणा साधला आहे.

कीर्तन ही जीवननिष्ठा झाली पाहिजे. कीर्तन म्हणजे करमणूक नव्हे. विनोदाचार्य निर्माण होणं ही कीर्तन परंपरेची अधोगती आहे, असं परखड मत सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे.

1289 मध्ये नामदेव रायांनी कीर्तन परंपरेचे पुनर्जीवन केले आहे. तुकोबा रांयांनी 17 व्या शतकात कळस केला. इंदोरीकरांची कीर्तनं महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकोबा रायांचा तर आपण इंदोरीकरांसारखा विचार करु शकत नाही, असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.

गेली 50-55 वर्षे कीर्तनं ऐकतो. मामासाहेब दांडेकर आणि त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली त्यामध्ये असे विनोद कधीच नव्हते, असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मी बोलवतीय, तुमच्यात हिंमत असेत तर…; तृप्ती देसाईंच इंदोरीकरांना आव्हान

-कोरेगाव-भीमा मध्ये अनावश्यक वातावरण निर्मिती करण्याला संभाजी भिडेच कारणीभूत- शरद पवार

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-8 दिवसांनंतर अखेर इंदोरीकर महाराजांनी नमतं घेतलं….!