‘या’ घटनेमुळे ‘बिग बी’ची मुलगी राहिली बॉलीवूडपासून लांब…

मुंबई |  बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक म्हणजेचं बच्चन कुटुंब. त्यामुळे बॉलीवूडचे ‘बिग बी’ अनेकदा त्यांच्या कुटुंबामुळे कायम चर्चेत असतात. अनेक कलाकार आणि चाहते त्यांच्या कुटुंबाला आदर्श मानतात. त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य अभिनयाशी जोडला गेलेला आहे.

तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलं अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन-नंदा दोघंही त्यांच्या करीयरमध्ये यशस्वी झाले आहेत. एकीकडे अभिषेकनं आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाचं, तर दुसरीकडे श्वेताने वेगळे करीयर निवडलं.

महानायक अमिताभ बच्चन तसेच त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय-बच्चन सगळेच कायम चर्चेत पहायला मिळतात. कुटुंबातील सगळेच अभिनय क्षेञात काम करत असताना अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा माञ या चंदेरी दुनियेपासून लांबच राहिली.

नुकताच श्वेता बच्चन- नंदाचा 47 वा वाढदिवस. श्वेता फिल्मी दुनियेपासून लांब असली तरी कायम चर्चेत असते. अभिनय क्षेञसोडून श्वेताने फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं. तिचा जन्म भारतात झाला असून उच्च शिक्षणासाठी श्वेता स्विर्झलॅंडला गेली. तिला फॅशनची आवड असल्यामुळे 2006 मध्ये तिने मॉडेलिंगला सुरूवात केली.

बॉलीवूडमध्ये घराणेशाही परंपरा असताना देखील ती या चंदेरी दुनियेपासून लांबच राहिली. 1997 मध्ये निखिल नंदा म्हणजेच रणबीर कपूरचा आतेभाऊ याच्यासोबत लग्न झाले. तिला अगस्त्य आणि नव्या नवेली ही दोन मुलं आहेत. तसेच श्वेता वेगवेगळ्या पार्टीज आणि इव्हेंट्समध्ये दिसतेस त्यामुळे ती कायम चर्चेत असते.

श्वेताने एका मुलाखतीत सांगितलं की, सुरूवातीच्या काळात मला अभिनय करणं खूप सोप आहे, असं वाटायचं. पण शाळेत असताना जेव्हा मी एका नाटकामध्ये अभिनय केला होता. त्या नाटकामध्ये मी एक हवाई गर्ल झाले होते. आणि त्या पाञासाठी मी खूप सराव केला होता. खूप मेहनत सुद्धा घेतली होती. पण तरीही अखेरच्या क्षणी मी माझे डायलॉग विसरले, त्यामुळे आमचं नाटक खराब झालं. तेव्हा मला कळालं, की अभिनय फार कठीण आहे.

या घटनेमुळे तिच्या मनात अभिनयाबद्दल भिती निर्माण झाली. तिनं कधीच अभिनय करणार नाही, असा निर्णय घेतला. तसेच अभिनय हे क्षेञ माझ्यासाठी नसून, तिने कॅमेरापासून लांब जाण्याचे ठरवले.

लग्नाच्या तब्बल 22 वर्षांनी श्वेताचा आता निखिल नंदासोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे श्वेताने इंन्टाग्रामवरील नंदा हे अडनाव काढले असून फक्त बच्चन ठेवलं आहे. या घटस्फोटचे नेमके कारण काय आहे, हे अजून समोर आले नाही. तरीही हे दोघं सध्या वेगळे राहत आहे. ती दिल्ली मध्ये न राहता आई-वडिलांसोबत मुंबई मध्ये रहात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

महत्वाच्या बातम्या-