‘या’ प्राणीसंग्रहालयातील चक्क 8 सिंहांना झाली कोरोनाची लागण

हैद्राबाद| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

अशातच प्रथमच प्राण्यांना सुद्धा कोरोना झाल्याची घटना घडली आहे. हैद्राबाद येथील नेहरू झुलॉजिकल पार्क मधील 8 सिंहाना एकच वेळी कोरोना झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे.

झुलॉजिकल पार्क मधील कर्मचाऱ्यांना सिंहामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. सिंहांमध्ये भूक कमी झाल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर नाकातून पाणी गळत होते आणि खोकला सर्दी झाल्यासारखे वाटत होते. याविषयी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब जाऊन झू प्रशासनाला सांगितलं.

या सगळ्या लक्षणांमुळे सिंहांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासणीत या सर्व सिहांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्राण्याच्या स्वॅबची तपासणी केल्यावर त्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यात सापडलेला कोरोनाचा स्ट्रेन कुठला आहे हे समजेल तसेच या प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचाही शोध घेतला जाणार आहे. कोरोना लॉकडाऊन मुळे हे प्राणी संग्रहालय नागरिकांसाठी बंद आहे.

दरम्यान, दिवसागणिक आरोग्य सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. ऑक्सिजन नाही, रूग्णालयात बेड्स नाहीत, औषधे नाहीत अशा स्थितीत सामान्यजन हवालदिल झाले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

शोकसभेत रडण्यासाठी ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती…

कोरोना ग्रस्तांसाठी विराट-अनुष्काची खास मोहिम,…

तळ्यावर पाणी प्यायला गेला बिबट्या; त्यानंतर जे घडलं ते पाहून…

पाठलाग करणं आलं अंगाशी; गेंड्याने रागात असं काही केलं की…

चक्क चिमणीने केला सापावर हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ