देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर आनंदच.. अन् महाराष्ट्राला फायदा- खडसे

नवी दिल्ली |  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणून जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावरच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. दिल्लीमध्ये येणं किंवा न येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीवर नाहीये… वरिष्ठांनी ठरवलं तर ते दिल्लीला जाऊ शकतात पण जर ते दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच आहे, असं खडसे म्हणाले आहेत.

दिल्ली विधानसभेसाठी येत्या 8 तारखेला मतदान पार पडत आहे. दिल्लीच्या प्रचारासाठी भाजपच्या मदतीला महाराष्ट्रातल्या प्रमुख भाजप नेत्यांची फौज उतरली आहे. खडसेदेखील दिल्लीला प्रचाराला गेले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना भाजपसाठी दिल्लीत चांगले दिवस आहेत, असं म्हटलं.

फोन टँपिगवर देखील खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं. माझा फोन टॅप होतोय, असं मल काधी वाटलं नाही पण जर झाला असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले.

दुसरीकडे केंद्रामध्ये अभ्यासू आणि अनुभवी नेत्यांची कमी जाणवते आहे. तसंच सुषमा स्वराज, अरूण जेटली आणि मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने भाजपमध्ये अभ्यासू आणि क्लीन नेत्यांची पोकळी निर्माण झाली आहे. हीच पोकळी किंबहुना व्हॅक्यूम भरून काढण्यासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच पंतप्रधान मोदी फडणवीसांच्या खांद्यावर महत्त्वाची धुरा देणार असल्याचीही माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली निवडणुकीनंतर शाहीन बाग जालियनवाला बाग होईल; ओवैसींचं खळबळजनक वक्तव्य

“थोडीशी माणुसकी असेल तर अण्णा हजारेंनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं”

-हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत!

-हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत!

-“बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”