‘मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करुन याबाबतचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत.

अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुकरोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचं गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! संजय राऊतांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका 

मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा देतो’, छगन भुजबळांचा शिंदे सरकारला टोला 

शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणारी ‘ती’ व्यक्ती ताब्यात, महत्त्वाची माहिती समोर

पेंग्विनची चेष्टा यात्रा म्हणत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात