अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी

मुंबई | मराठा समाजाच्या हितासाठी अशोक चव्हाण यांनी एकही बैठक घेतली नाही. मराठा समाजासाठी केलेली ठोस कामं जाहीर केली नाहीत, तर त्यांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी. अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंबंधीचं पत्रही मुख्यमंत्री कार्यालयात देण्यात आलं आहे.

या मागणीकडं दुर्लक्ष केल्यास ९ ऑगस्ट रोजी जनआंदोलनाचा इशाराही रमेश केरे-पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. कोर्टात आपली बाजू भक्कम मांडण्यासाठी सरकारनं किती तयारी केली आहे? असा सवालही केरे- पाटील यांच्याकडून विचारण्यात आला.

सरकार मराठा आरक्षणासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती समाजाला मिळणं गरजेचं आहे. मात्र अद्याप मराठा उपसमितीची बैठक घेण्यात आलेली नाही. जर बैठक होणार नसेल, तर चव्हाणांना अध्यक्ष पदावरून हटविण्यात यावं. असंही मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मात्र केरे-पाटील यांनी केलेले आरोप अपूर्ण माहितीवर असल्याचं अशोक चव्हाण यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. उपसमिती स्थापनेचा निर्णय झाल्यावर दुसऱ्याच दिवशी विधानसभेत बैठक पार पडली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होण्यापूर्वीही उपसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. असंही कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चीनी कंपन्यांसोबतचे करार ठाकरे सरकारने रद्द केले नाहीत तर….; सरकारकडून स्पष्टीकरण

-…तर कोणतीही शिक्षा भोगेन; हसन मुश्रीफांचं चंद्रकांतदादांना खुलं आव्हान

-“भारतीय सैनिकांचं रक्त सांडताच शिवरायांच्या महाराष्ट्राने चीन्यांसोबतचे करार रद्द केले तसं….?”

-तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

-भारत-चीन संघर्ष, राजनाथ सिंग यांनी रशियाकडे केली ही महत्त्वाची मागणी