‘अत्यंत घाण भाषेत कलाकार सुद्धा…’, ‘हा’ अभिनेता ट्रोलर्सवर भडकला

मुंबई| अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असतो. मात्र अनेकदा सोशल मीडियाचा वापर कलाकरांसाठी डोकेदुखी ठरतो. असेच काहीसे अभिनेता शशांक केतकरसोबत झाले आहे. गलिच्छ भाषेत ट्रोल करणाऱ्याला युजरला त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

शशांक सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत काम करत आहे. त्यात तो खलनायकाची भूमिका साकारत आहे. शशांकची ही पहिलीच खलनायकाची भूमिका आहे. त्यामुळे त्याला विविध प्रकारच्या कमेंट्सचा सामना करावा लागत आहे.

एका चाहत्याला त्याची ही भूमिका आवडत नसल्याने त्याने गलिच्छ भाषेत कमेंट करत प्रतिक्रिया दिली. ती कमेंट पाहून शशांक शांत बसला नाही. त्यावर उत्तर देत शशांक म्हणाला, ‘कलाकरांशी आदराने वागा, पुण्य लाभेल.’ शशांकची ही कमेंट पाहून ट्रोलरने देखील उत्तर दिले.

पुढे शशांक म्हणाला, ‘तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल, तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अॅक्टिंग सुरु करा आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघायची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकार सुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, गोष्टींना लॉजिक नाही वैगरे कमेंट एकीकडी आणि ढुंगण वैगरे शब्द वापरुन रिअॅक्ट होणे एकीकडे.’

‘आम्ही फक्त चेहरे असतो. आमच्यावर किमान 15 जणं असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काही तरी करुन बघायचं होतं आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी पाहायचं होतं. ही मालिका आहे. अजून खूप गोष्ट बाकी आहे. एक निगेटिव्ह पात्र असतं म्हणूनच पॉझिटिव्ह वागणारे हिरो असतात. मेणबत्तीचं अस्तित्व तेव्हाच जेव्हा बाजूला काळाकुट्ट अंधार असतो’ असे शशांक त्या ट्रोलरला उत्तर देत म्हणाला.

दरम्यान, रसिकांनी कल्पनाही केली नसणार अशा भूमिकेत शशांक केतकर सध्या मालिकेत झळकतो. आत्तापर्यंत नायकाच्या भूमिकेत दिसणारा शशांक या मालिकेतून प्रथमच निगेटीव्ह भूूमिकेत रसिकांच्या भेटीला आला आहे. आपली ही भूमिका रसिक कसे स्वीकारणार, याबाबत शशांक जरा साशंक होताच. त्यामुळे सुरुवातीलाच आता मला शिव्या खाव्या लागणार, असे त्याने म्हटले होते.

trolling

 

महत्वाच्या बातम्या – 

इंजेक्शन घेताना आजीने दिली जबराट रिअॅक्शन, व्हिडीओ पाहून…

फोनवर बोलता-बोलता नर्सने दिली महिलेला दोनदा कोरोना लस,…

मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता गरिबांच्या पोटापाण्याची काळजी…

कलिंगड घेताना चुकूनही करु नका ‘ही’ चूक, नाहीतर खाल्ल्यावर…

कोरोनाची लस घेतल्यानंतर चुकूनही करु नका ‘या’ 5…