काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मुख्यमंत्र्यांशी जवळीक; करणार भाजप प्रवेश???

मुंबई : काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विविध भागातून जोरदार धक्के बसत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘गयारामां’नी काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. अशातच मुंबईतील एक मातब्बर काँग्रेसचा नेता आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कृपाशंकर सिंग यांची गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढल्याचं समजतयं. गणेश दर्शनाच्या निमित्ताने फडणवीसांनी कृपाशंकर सिंग यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. यावरुन ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 

कृपाशंकर सिंग यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर कृपाशंकर यांनी सरकारची स्तुती करत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृपाशंकर यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली होती. या बैठकीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा केली, अशी माहिती समोर आली होती. आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

महत्वाच्या बातम्या-