केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई | केंद्र सरकार आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्याचा फायदा लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central staff) होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चांगली बातमी मिळू शकते. डीए (DA) वाढवण्यासोबतच आता आणखी एक भत्ता वाढवण्याचा सरकार विचार करत आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

डीए वाढीसह एचआरए (HRA) वाढीचीही घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, डीए वाढीबरोबरच एचआरएमध्येही सुधारणा अपेक्षित आहे.

ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळू शकतो. यासोबतच एचआरएमध्ये वाढ करण्याची घोषणाही लवकरच केली जाऊ शकते.

डीएसोबतच एचआरएमध्येही वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानंतर डीए देखील 28 टक्के करण्यात आला. आता डीए 40 टक्के होणार आहे तेव्हा एचआरएमध्येही सुधारणा करता येईल.

X श्रेणीतील शहरांमध्ये राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा HRA DA प्रमाणेच 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोाठी बातमी! शिंदे सरकारचा संजय राऊतांना पहिला दणका 

“पवारसाहेब जागतिक नेते, मोठे नेते मग पवारांकडच जा, इथं कशाला अडकून पडलाय” 

“आत्ता तरी माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये” 

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 6 वर्षीय चिमुकल्याचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू 

‘त्या रात्री उद्धव ठाकरेंनी…’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा