मुंबई | आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कोणत्या कारणावरून सामाजिक वातावरण बिघडेलं हे सांगता येत नाही. त्रिपुरा येथील कथित धार्मिक हिंसाचाराच्या घटनेनं सध्या देशभरात तणावाचं वातावरण आहे.
त्रिपुरामधील पानीसागरमध्ये धार्मिक हिंसाचाराला प्रामुख्यानं पहिल्यांदा सुरूवात झाली. याठिकाणी विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानं जाळपोळ झाली.
पानीसागरमधील घटनेचे व्हिडीओ आणि मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आले आणि सर्व त्रिपुरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला. परिणामी त्रिपुरातील परिस्थिती चिंताजनक बनली होती.
त्रिपुरामध्ये घडत असलेल्या या हिंसाचारात एका विशिष्ट समाजावर अन्याय होतोय. असं समजून महाराष्ट्रात विविध भागात मोर्चे काढण्यात आले. परिणामी या मोर्चांना ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं आहे.
अमरावती जिल्ह्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार राजकारण पेटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारनं केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अमरावती येथील घडलेल्या घटनेसंदर्भात योग्य कारवाई करण्यात येत नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुद्दाम काही जणांना या प्रकरणात गोवल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस यांच्या टीकेवर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उगाच फडणवीस यांनी लोकांची माथी भडकावण्याचं काम करू नये, असं म्हटलं आहे.
अर्धवट माहितीमुळं वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. परिणामी फडणवीस यांनी थोडा संयम राखावा, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी तणावग्रस्त भागाचा दौरा करताना सरकारवर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला होता. परिणामी सरकार आणि फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
दरम्यान, त्रिपुरातील घटनेवरून राज्यातील वातावरण खराब होता कामा नये असं ठाकूर म्हणाल्या आहेत. तसंच हा महाराष्ट्र शांत रहायला हवा असंही ठाकूर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी! प्रमोद महाजन यांची जागा घेणारे दुसरे नेते ठरले तावडे
“कंगणाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही पद्मश्री व्हायचंय दिसतंय”
“हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा”
“जे एअर इंडिया, रेल्वे विकतात, त्यांनी एसटीवर बोलू नये”
शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश