बॉलिवूडवर पुन्हा एकदा पसरली शोककळा, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन!

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीने 2020 मध्ये अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलेली असताना अश्यातच, आणखी एक दुःखद घटना समोर येत आहे. प्यार तुने क्या किया, रोड, उम्मीद, लव इन नेपाल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांनी 18 जुलैच्या रात्री जयपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी यांनी ट्विट करून निधनाची वार्ता देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मनोज वाजपेयी हे रजत मुखर्जी यांचे जवळचे मित्र होते. त्याबरोबरच, दोघांनी एकत्र काम ही केलं आहे.

मनोज वाजपेयी यांनी ट्विट मध्ये असं लिहिलं आहे की, ” माझा मित्र आणि रोडचा दिग्दर्शक रजत मुखर्जी याचा जयपूरमध्ये आजाराशी दीर्घकाळ लढताना मृत्यू झाला आहे. तुला शांती लाभो. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता आपण भेटू शकत नाही आणि पुन्हा एकदा एकत्र काम करू शकत नाही. जिथे आहेस तिथे खुश राहा.”

रजत मुखर्जी यांच्या जाण्याने बॉलीवूडला आणखी एक धक्का बसला आहे. दीर्घकाळापासून ते किडनीच्या समस्येला तोंड देत आहेत. त्यांच्यावर उपचार ही चालू होते. मात्र, अखेर त्यांना किडनीच्या समस्येमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईत सुरू आहे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार

तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत पण… अमिताभ बच्चन झाले भावुक!

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल