चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याचा ऐन तारुण्यात मृ.त्यू

मुंबई | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट ठरलं आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. आपल्या अभिनयातून सर्वांना भुरळ घालणाऱ्या फराज खानचे आज नि.धन झालं आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून  फराजला ‘न्युरोलॉजिकल डिसऑर्डर’ या आजाराणे ग्रासलं होतं. बंगळूरू मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये फराजवर उपचार देखील चालू होते. फराज या आजाराशी गेल्या अनेक महिन्यांपासून झुंज देत होता. मात्र, आज अखेर फराजची हॉस्पिटलमध्येच प्राणज्योत मावळली. अभिनेत्री पूजा भट्टने फराज खानच्या मृ.त्यूची बातमी दिली आहे. पूजाने ट्वीट करत फराजच्या मृ.त्यूचे दुःख व्यक्त केलं आहे.

खूप जड अंतकरणाने मी तुम्हा सर्वांना एक दुःखद बातमी देत आहे की, अभिनेता फराज खान आपल्या सर्वांना सोडून या जगातून गेला आहे. फराज खानसाठी आपण सर्वांनी जी मदत आणि प्रार्थना केली त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देते, असं पूजा भट्टने म्हटलं आहे.

तसेच फराज खानच्या कुटुंबाला मदतीची सर्वात जास्त गरज होती. त्या कठीण काळात आपण सर्वजण मदतीसाठी पुढे आलात. आता फराजच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूयात. फराजच्या अचानक जाण्याने मनामध्ये एक पोकळी तयार झाली आहे, असंही पूजा भट्टने म्हटलं आहे.

‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ सारख्या चित्रपटात फराज खानने भूमिका केल्या होत्या. काही मालिकांमध्ये देखील फराजने काम केलं होतं. फराजचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत होता. मात्र, आता फराजच्या मृ.त्यूमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीसह त्याच्या चाहत्यांवर देखील शोककळा पसरली आहे.

दरम्यान, फराज खानला ब्रेन इन्फेक्शन आणि न्युमोनिया झाल्याचं निदान झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार चालू करण्यात आले होते. मात्र, फराजच्या उपचारावेळी त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण पैसे संपले. यामुळे फराजच्या उपचारामध्ये देखील खंड पडला.

यानंतर फराजच्या कुटुंबाने फराजच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.. अभिनेत्री पूजा भट्टने देखील सोशल मीडियावरून फराजच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पूजा भट्टच्या आवहानानंतर अनेकांनी फराजला मदत केली.

अभिनेता सलमान खान देखील फराजच्या मदतीसाठी पुढे धावला होता. सलमान खानने कोणताही गाजावाजा न करता फराजच्या उपचाराचे सर्व पैसे भरले होते. अभिनेत्री कश्मिरा शाहने सोशल मीडियावर यासंबंधित पोस्ट लिहित माहिती दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सारा अली खानची ‘ती’ गोष्ट सलमानला आवडली तेव्हा साराला मिठी मारत सलमानने…

अत्यंत धक्कादायक!!! अर्णब गोस्वामीला अ.टक करण्यामागचं खरं कारण आलं समोर!

कंगणा राणावतला आणखी एक मोठा धक्का; मुंबई पोलिसात…

आता शिल्पा शेट्टी कुंद्रा घेवून येत आहे टिक टॉकसाठी ‘हा’ पर्यायी अॅप

…म्हणून ऐश्वर्याने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला; वाचा ऐश्वर्याचा बालपण ते सुप्रसिद्ध अभिनेत्री पर्यंतचा प्रवास