धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणाऱ्यासह दहा ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल

मुंबई | व्हॉट्सअप ग्रुपवर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश टाकल्याप्रकरणी एका ग्रुपच्या अ‍ॅडमीनसह 11 जणांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रुपवर धार्मिक तेढ आणि दुही निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरून यासंबंधी तक्रार मिळाली होती.

एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारा मेसेज ग्रुपवर टाकला गेला होता. या ग्रुपच्या दहा अ‍ॅडमीनसह  ग्रुपवर संदेश टाकणाऱ्या अन्य एक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या ग्रुपवर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरुन तक्रार प्राप्त झाली होती. बोईसर पोलिसांनी त्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन व पोस्ट टाकणाऱ्या आरोपीविरोधात माहिती घेत त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  केला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल केलेल्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-‘हातावरचं पोट असणाऱ्या लोकांची काळजी घ्या;’ सोनिया गांधींच पंतप्रधानांना पत्र

-कर्तव्यनिष्ठ खाकी; मुलगा मृत्यूशी झुंज देत असताना बाप बजावतोय कर्तव्य

-“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा डिजिटल माध्यमातून साजरी करा”

-MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा; यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

-‘या’ दोन राज्यात सोमवारपासून मद्य विक्री सुरू होणार!