जाणून घ्या! दररोज बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं विसरुन जातो. त्यामुळे रोजच्या खाण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. बीट हे आपल्या शरीरासाठी लाभदायक असतं हे सर्वांना माहीत आहे. आपल्या पैकी अनेकांना बीटाची चव आवडत नाही. परंतु, बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे, त्याला ‘सुपरफूड’ देखील म्हटले जाते.

बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे – 

1. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे बीट. बऱ्याच वेळा सॅलड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीट आवर्जुन दिलं जातं.

2. बीटाच्या रसात लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम, जस्त, तांबे आणि सेलेनियम असते. ही सर्व खनिजे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि दात व हाडे निरोगी ठेवतात.

3.  घशात जळजळ होत असल्यास बीटाचा रस घ्यावा. बीटचा रस योग्य प्रमाणात पिण्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी चांगली राहते.

4. बीटमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते.

5. बीटामध्ये असणारं फॉस्फरस हे केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट समजण्यात येतं. खरंतर केसांच्या वाढीसाठी बीट हा नैसर्गिक सोर्स आहे. केसांची वाढ करण्यासाठी याचा अत्यंत फायदा होतो.

6. बीटमध्ये फॉलिक अॅसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. बीटमुळे महिलांना ऊर्जा मिळते. मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं.

7. तुम्हाला लवकर थकवा येत असेल आणि ऑक्सिजनचाही त्रास होत असेल तर हे तुमच्या शरीरातील कमी रक्तामुळे होतं. अशावेळी तुम्ही बीटाचा रस नक्की प्यावा. याचा तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. यामध्ये नैसर्गिक ऑक्सिजन असल्याने तुम्हाला त्वरीत ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा  कमी होण्यास मदत मिळते.

8.  दोन चमचे बीटचा रस आणि मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधिस समस्या दूर होतात.

महत्वाच्या बातम्या – 

महादेव जाणकरांचा बारामतीबद्दल पवारांना ईशारा, म्हणाले…

पॅराग्लायडींग करण्याचं धाडस केलं, पण चांगलंच अंगलट आलं;…

तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडनं किस केलं तर??? शाहरुखच्या…

हिरेन प्रकरणातील ती मर्सिडीज भाजप नेत्याची? सचिन सावंत यांचा…

मुलानं आईच्या कानशिलात लगावली, अन् आईनं जागेवर प्रा.ण सोडले;…