घरोघरी जाऊन कोरोनाबाधितांचा शोध घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई | मुंबईमधील वरळी कोळीवाडयात करोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाडाचा परिसर दूषित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तेथील नागरिकांच्या हालचालीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या उपायुक्त तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि काही सूचना दिल्या आहेत.

12 ते 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या व्यक्तींचे संपर्कात आलेल्या व्यक्ती अधिक बारकाईने तपासा आणि त्यांना क्वारंटाईन कसे करता येईल ते पहा. अद्यापही काही व्यक्ती सापडू शकलेल्या नसतील त्या कोणत्याही परिस्थितीत शोधा. यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या.

अजूनही काही बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी दिसते. तेथील भाजीबाजारांमध्ये शिस्त आणा, त्यांना गल्लय़ा किंवा तारखा वाटून द्या. प्रसंगी बाजार मोकळ्या जागांवर स्थलांतरित करा अशा सुचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

दरम्यान, आपापल्या प्रभागामधील  खासगी डॉक्टर्सना शोधून त्यांना त्यांचे दवाखाने सुरु करण्याची विनंती करा, त्यांना आवश्यक ते मास्क वगैरे द्या. त्यामुळे नियमित रुग्ण तपासण्यास सुरुवात झाली तर शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-मुंबईत झोपडपट्ट्या, चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण; खबरदारी म्हणून 147 ठिकाणं पालिकेकडून सील

-देशात कोरोनाच्या चाचण्यांची सर्वाधिक सुविधा महाराष्ट्रात- आरोग्यमंत्री राजेश टोपे

-दिल्लीतील ‘तब्लिग-ए-जमात’मध्ये सहभागी झालेले 199 जण महाराष्ट्रातील; संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु

-कोरोना कसा पसरतो?; अमोल कोल्हेंनी समजावला कोरोनाचा गुणाकार

-धोक्याची घंटा… राज्यात एका दिवसात तब्बल 72 रुग्ण वाढले; बाधितांचा आकडा 300 पार