…म्हणून सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात केला गुन्हा दाखल; तक्रारीमध्ये केले ‘हे’ धक्कादायक आरोप!

मुंबई | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहने वांद्रा येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता. सुशांतने दबावाखाली असल्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. सध्या सुशांतच्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि  बॉलिवूडमधील काही कलाकारांची चौकशी चालू आहे. मात्र अशातच सुशांत सिंहच्या वडिलांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली आहे. रिया चक्रवर्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीविरोधात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्तीवर, पैसे उकळल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात संजय सिंग यांनी एएनआयला माहिती दिली आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रहमण्यम स्वामी, भाजप खासदार निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सूमन यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तर जाणार का?; शरद पवार म्हणाले…

भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार?, फडणवीसांनी जरा स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

“पंतप्रधानांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधात”

पार्थ पवार आमदार होणार का?; राष्ट्रवादीने केला खुलासा…

‘बकरी ईदला कुर्बानी द्यायचीच असेल तर आपल्या मुलांची कुर्बानी द्या’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!