चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | प्रत्येकाच्या आयुष्यात निरोपाची वेळ ही ठरलेली असते. एखाद्या जागेवरून, ऑफिसवरून आपण काम सोडून जात असताना भावनिक होत असतो. असाच सर्वांना भावनिक करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट अटेंडंट सुरभी नायर यांचा कामाचा शेवटचा दिवस होता. कामाचा शेवटच्या दिवस असल्यानं सुरभी नायर भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

कामाचा शेवटचा दिवस, शेवटचा तास, शेवटची अनाऊंसमेंट करताना सुरभी भावनिक झाल्या होत्या. सुरभी यांना बोलताना पाहून विमानातील प्रवासी देखील भावूक झाले होते.

माझ्या आयुष्यात हा दिवस इतक्या लवकर येईल असं मला कधीच वाटलं नाही. माझ्यासाठी माझं घर आणि हे फ्लाईट माझ्या ह्रदयाचे दोन तुकडे आहेत, असं सुरभी म्हणाल्या आहेत.

मला निरोप घेताना खूप जास्त वाईट वाटत आहे, असं सुरभी म्हणाल्या आहेत. सुरभी नायरचा हा व्हिडीओ नेटकरी विविध कॅप्शन देत शेअर करत आहेत.

फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे.

सुरभी नायर या इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचारी होत्या. पुढील वाटचालीसाठी त्यांना ही नोकरी सोडावी लागली. पण नोकरी सोडत असताना सुरभी यांनी सर्वांना भावनिक केलं आहे.

दरम्यान, फ्लाईट अटेंडंट असणाऱ्या सुरभी नायरचं अनेकजण कौतूक करत आहेत. तर अनेकांनी आम्हाला देखील आमच्या निरोपाच्या वेळेची आठवण झाल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 “दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका” 

…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी