“मोदींनी जगभर दौरे करण्यापेक्षा देशात थांबून अर्थव्यवस्था सुधारावी”

मुंबई |  जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारताच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून कडाडून टीका करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान मोदींनी जगभर दौरे करण्यापेक्षा देशात थांबून अर्थव्यवस्था सावरावी, असं बोचरी टीका ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अ‌ॅट होम’ या लेखातून केली आहे.

‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अ‌ॅट होम’ हा लेख फोर्ब्सच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. कोलंबिया विद्यापिठामधील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक असणाऱ्या पॅनोस मॉर्डोकोउटास यांनी ‘फोर्ब्स’साठी हा लेख लिहिला आहे.

एकीकडे मोदी रशियापासून अमेरिकेपर्यंत शक्तीशाली देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेत आहेत तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून जीडीपी 8 टक्क्यांहून 5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे, असं लेखात म्हटलं आहे.

भारतीय अर्थव्यवस्था, बेरोजगारी, उत्पादन आणि उद्योगांची झालेली दैना यावरही या लेखात भाष्य करण्यात आलं आहे. 

भारतात सगळं काही ठीक आहे, हे जगाला कितीही ओरडून सांगितलं तरी सद्यपरिस्थिती बदलणार नाही, असंही लेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-