‘…तर मी आत्महत्या करेन’; हर्षवर्धन जाधव यांचा इशारा

औरंगाबाद | नुकतेच राजकारणातून निवृत्तीची घोषणा करणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला रावसाहेब दानवे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहे. गेल्या काही दिवसांपासून दानवे आणि जाधव यांच्यामध्ये कुजबूज सुरू होती. त्यावर आता जाधव यांनी रावसाहेब दानवे मला प्लॉट मागत असून त्याकरिता ते मला गुंड पाठवून मारतील, पोलीस माझ्या मागे लावतील अशा प्रकारचे आरोप केले आहेत. तसेच माझ्या आईवर दानवेंनी गुन्हा दाखल केला असून माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांनी मला दिली असल्याचं जाधव यांनी म्हंटल आहे.

रावसाहेब दानवे यांनी मला जर त्रास देणं थांबवलं नाही तर मी आत्महत्या करेन असा इशारा सुद्दा हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना दिल्याचं कळतंय.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी रावसाहेब दानवे यांनीच माझ्या मुलावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावला, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

-राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!

-कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अजित पवार यांची मोठी घोषणा

-कुख्यात डॉन अरुण गवळीबाबत नागपूर न्यायालयाचा मोठा निर्णय!

-देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ