माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन

अहमदनगर|  देशातील कोरोनाचं संकट अजून टळलं नाही. याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्नांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्यातच माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे.

दिलीप गांधी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर दिल्लीतच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

दिलीप गांधी हे संघ परिवारात मोठे झाले तसेच भारतीय जनता पक्षाशी ते कायम एकनिष्ठ राहिले. दिलीप गांधी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तसेच एक वेळा त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवलं.

सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

आज पहाटे दिलीप गांधी यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं दुःखद निधन झालं आहे. निधनाची बातमी कळताच संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली असून अनेक सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांना समाजमाध्यमांवर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

चाहत्याचं अनोखं गिफ्ट पाहून रितेश झाला भावूक; पाहा व्हिडीओ

तुळशीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे…

अजित पवारांबर बैठकीला उपस्थीत असणाऱ्या पुण्याच्या…

मोठी बातमी! रोजच्या चलनातील 2000 रुपयांच्या नोटांबद्दल…

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाणं तिच्या चांगलंच अंगलट…