‘एखादा अधिकारी तुमचं ऐकत नसेल तर बांबू उचला आणि त्याला झोडा’; केंद्रिय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. पश्चिम बंगालसह देशातील ईतर ५ राज्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यामुळे देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

अशातच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे देशभरातून त्यांच्यावर टिका केली जात आहे.

बिहारमधील बेगुसराय येथे गिरीराज सिंह एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधला. अनेक लोकांनी गिरीराज सिंह यांच्यासमोर त्यांच्या अडचणी मांडल्या.

या सभेदरम्यान एका व्यक्तीने शासकीय अधिकाऱ्याची तक्रार त्यांच्यासमोर मांडली. त्यावर उत्तर देताना गिरीराज सिंह म्हणाले की, जर एखादा अधिकारी तुमचं ऐकत नसेल तर बांबू उचला आणि त्याला झोडा. अशा लहान लहान गोष्टी मला सांगण्याची गरज नाही.

हा तुमचा अधिकार आहे. जर तुमच्या अधिकाराची पायमल्ली होत असेल तर मी तुमच्यासोबत उभा असेल. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला चुकीचं काम करण्यास सांगत नाही. तसेच कोणत्याही अधिकाऱ्याचे बेकायदेशीर कृत्य सहन देखील करुन घेत नाही, असं वक्यव्य गिरीराज सिंह यांनी केलं आहे.

दरम्यान, गिरीराज सिंह हे नेहमी त्यांच्या कोणत्या ना कोणत्या विधानामुळे विरोधकांच्या निशाण्यावर येतात. अशातच आता गिरीराज यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातच वादग्रस्त वक्तव्य केल्यानं देशभरातून त्यांच्यावर टिका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

खुशखबर! एलपीजी दरवाढीच्या काळात अशी बुकिंग केल्यास मिळेल मोठी सूट; वाचा सविस्तर

“आता फक्त नोटांवर महात्मा गांधींच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो छापायचं बाकी आहे”

पूजा चव्हाण प्रकरणाला गंभीर वळण! पूजाच्या छोट्या बहिणीबरोबर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?”

जाणून घ्या! बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे