“मंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानाला शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावे द्या”

मुंबई |  ज्या मंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानांना नावे देण्यात आली नाहीत त्या निवासस्थानांना छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची नावे द्यावीत, अशी मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. याचसंबंधी उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहिलं आहे.

मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून उदय सामंत यांनी यासंबंधीची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आम्ही मंत्री म्हणून ज्या निवासस्थानात राहतो त्याची नावं आजही A2, B2, C2 अशी आहेत. आणि मलबार हिलला जे बंगले आहेत त्यांची नावे गडकिल्ल्यांची नावे आहेत. मंत्री म्हणून मी मागणी करतो की जे इंग्रजी नावांचे 20 बंगले आहेत त्यांची नावे गडकिल्ल्यांच्या नावांवरून देण्यात यावेत, असं सामंत म्हणाले.

कॅबीनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना वाटप करण्यात आलेल्या काही शासकीय निवासस्थानांना विविध नावे देण्यात आली आहेत. परंतू मंत्रालयासमोरील निवासस्थानांना तशी नावे दिलेली नाहीत. मी विनंती करतो की मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला तसे आदेश द्यावेत, असं सामंत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आज संपूर्ण जगामध्ये जिथे कुठे मराठी माणूस आहे तिथे मराठी राजभाषा दिन अतिशय उत्साहात साजरा होतोय. आज महाराष्ट्र विधानभवन परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-काश्मिरी तरुणीने गायलेलं मराठी गाणं राज ठाकरेंनी केलं शेअर

-भाईजानच्या खास अंदाजात येणार ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक!

-‘आप’ नेत्याच्या घरावर सापडला पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा

-अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे; सुशीलकुमार शिंदेंचा पंतप्रधानांवर निशाणा

-मराठीचा ‘सोशली’ वापर तब्बल हजार टक्क्यांनी वाढला