गुड न्यूज! अखेर कोरोनावर औषध सापडलं, डीजीसीआयकडूनही मिळाली परवानगी

मुंबई | नवी मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षणावर औषध तयार केलं आहे. या औषधाला भारतीय औषध महानियंत्रक यांनीही परवानगी दिली आहे.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. मात्र अद्यापही लस सापडलेली नाही. तोवर उपलब्ध असणाऱ्या काही औषधांच्या मिश्रणातून कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.

नवी मुंबई तळोजा MIDC मधील ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी अँटिव्हायरल औषध फेविपिरावीरला फैबि फ्लू नावाने पुढे आणलं आहे. शनिवारी याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे.

भारतीय औषध महानियंत्रक डीजीसीआयने या औषधाच्या निर्मितीसाठी आणि मार्केटिंगसाठी परवानगी दिली आहे. फैबि फ्लू हे औषध कोविड 19 रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“…तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?”

-“घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही”

-नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले

-यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; पाहा कोणत्या शहरात किती वाजता दिसणार?

-सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा