“रझाकारांची औलाद नाही, मग मराठवाडा मागास का आहे???”

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर जबरी टीका केली होती. हैदराबादमधून इकडे आले, एमआयएमच्या नावानं आले, दंगली घडवू लागले. ते रझाकारीचीच औलाद आहेत, म्हणूनच ते ध्वजारोहण सोहळ्याला इकडे आले नाहीत, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलिल यांच्यावर टीका केली होती.

केवळ 1 दिवस झेंडा हातात घ्यायचा अन् मराठवाडा मराठवाडा करायचं. काय केलं तुम्ही इतक्या वर्षात मराठवाड्याच्या विकासासाठी? आज मराठवाडा मागास आहे, तो यांच्यासारख्याचं नेत्यांमुळेच. मला शिव्या घालणाऱ्यांना मी हा प्रश्न विचारतो. मराठवाडा इतका मागास का आहे? सत्तेत तुम्ही होता, रझाकारांची औलाद नाही, असं म्हणत जलिल यांनी खैरे यांना लक्ष्य केलं आहे.

संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त ध्वजारोहणही करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते औरंगाबादमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. 

माझ्यासाठी का आला नाही किंवा आला हा मुद्दा गौण आहे. विकासाचे मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढील वर्षी मुख्यमंत्र्यांना बोलावू नका, मला बोलवा. मी येतो ध्वजारोहणाला. माझ्या हस्ते ध्वजारोहण करा, असं जलिल यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादच्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात माझी महत्त्वाची बैठक होती. औरंगाबाद आणि शिर्डीच्या दरम्यानचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तो, रस्ता सुधारण्यासाठी मी एक प्रपोजल तयार केलयं, जे मी घेवून तिथे गेलो होतो. असं जलील यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –