तळीरामांसाठी खुशखबर! ‘ड्राय डे’च्या नव्या तारखा जाहीर, आता फक्त…

नवी दिल्ली | दिवसेंदिवस देशातील मद्यप्रेमींची संख्या वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. कोरोना काळात तळीरामांची वांदे झाल्याचं पहायला मिळालं होतं.

अशातच आता दिल्ली सरकारने मद्यप्रेमींना मोठी भेट दिली आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आतापासून दारूची दुकाने वर्षातून फक्त तीन दिवस बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क आयुक्तांनी या नव्या निर्णयाची माहिती दिली.

आत्तापर्यंत दिल्लीतील दारूची दुकाने वर्षातून 21 दिवस बंद असायची. सणवार आणि महत्त्वाच्या दिवशी ‘ड्राय डे’ असायचे आता फक्त तीन दिवस ड्राय डे असणार आहे.

नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार दिल्लीतील ‘ड्राय डे’ फक्त तीन दिवसांवर आणण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंतीला ड्राय डे असणार आहे.

या तीन दिवसा व्यतिरिक्त आणखी काही दिवस वेळेनुसार लावले जाऊ शकतात, असंही या आदेशात म्हटलं आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मार्च 2021 मध्ये ड्राय डेची संख्या कमी करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर आता सरकारने आदेश दिले आहेत.

दरम्यान, ड्राय डे बरोबरच दारू पिण्याचं वय 21 करण्याचंही आश्वासन सिसोदिया यांनी दिलं होतं. त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

“भाजपनं आपल्या जन्माचा दाखला दाखवावा”; संजय राऊत संतापले

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “युतीमध्ये असताना…”

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”