HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; झाला ‘हा’ मोठा बदल

मुंबई | HDFC या खासगी बँकेने एक योजना आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. बँकेने मुदत ठेवीच्या म्हणजेच्या एफडीच्या दरांमध्ये (FD Rates) वाढ केली आहे.

हे नवे दर 20 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. HDFC बँकेचे हे नवीन व्याजदर (HDFC Bank latest FD interest rates) 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या FD वर लागू होतील.

बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांना 7 ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिलं जात आहे. याशिवाय बँक 30 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहेत.

नवीन बदलानुसार, HDFC बँक 91 दिवस ते 6 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

त्यानुसार, एक वर्ष एका दिवसापासून ते दोन वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.10 टक्के दराने व्याज दिलं जाईल.

दोन वर्षं एक दिवस ते तीन वर्षं कालावधीच्या FD वर 5.20 टक्के दराने व्याज दिलं जाईल. तसंच तीन वर्षं एक दिवस ते पाच वर्षांपर्यंतच्या FD वर 5.45 टक्के व्याजदर दिला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Kieron Pollard Retirement: 6 चेंडूवर 6 षटकार खेचणाऱ्या कायरन पोलार्डचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दिल्लीच्या फिरकीपुढे पंजाबच्या फलंदाजांचे लोटांगण; 9 गडी राखत दणक्यात विजय

पिंपरी-चिंचवडचे डाॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली!

नवरा मध्यरात्री उठून असं काही करायचा की…; बायकोला तर धक्काच बसला

ऐकलं का??? देशाच्या अर्थमंत्री म्हणतात, “भारतात खूप काही महागाई नाही”