सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदारांच्या पीएफ खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा होणार असल्याची चर्चा आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं कळतंय.

भविष्य निर्वाह निधी संघटना दिवाळीपूर्वी नोकरदारांच्या खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा करेल, असा अंदाज आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी EPFO केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे.

दिवाळीपूर्वी कधीही हे पैसे नोकरदारांच्या पीएफ खात्यात जमा होऊ शकतात. तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे माहिती करुन घेणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन एक कॉल किंवा मेसेज करावा लागेल.

तुम्हाला आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन मिसकॉल देऊन पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करता येतो. आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा. दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

आपल्या नोंदणीकृत मोबईल नंबरवरुन “EPFOHO UAN” टाईप करुन 7738299899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजी आधी निवडलेली भाषा असते. याशिवाय मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, मल्यालम, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली भाषांचा समावेश आहे.

आपल्या मोबाईलवरुन 011-22901406 या नंबरवर कॉल करा. दोन रिंग वाजल्या की तुमचा फोन आपोआप कट होईल. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”

परतीचा पाऊस झोडपणार! येत्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

“ओबीसी आरक्षण ‘त्या’ विचारांना मान्य नाही, विरोधात कोण हे आता समजलं असेल”