राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे विजयी

मुंबई | राज्यसभेच्या 24 जागांसाठी आज दहा राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. यापैकी पाच जागा बिनविरोध तर 19 जागांसाठी मतदान झालं. राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, आंध्रप्रदेशात चारही जागा वायएसआर काँग्रेसला, राजस्थानात दोन काँग्रेस, एक भाजप आणि मध्य प्रदेशात दोन भाजप तर एक जागा काँग्रेसला मिळाली.

मध्य प्रदेशात भाजपकडून रिंगणात असलेले ज्योतिरादित्य शिंदे विजयी झाले आहेत. याशिवाय काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांनीही बाजी मारली.

आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर या राज्यांमध्ये चुरस पाहायला मिळली. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. त्यानंतर निकाल हाती आले.

आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कर्नाटकात चारही जागांवर, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एका जागेवर बिनविरोध निवडणूक झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-MPSC परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा पठ्ठ्या प्रसाद चौघुले राज्यात अव्वल

-सुशांत प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीची तब्बल 9 तास चौकशी; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे!

-“सीमेवरच्या जवानांच्या हातात काठी कसली देता?, तिथे काय RSS ची शाखा आहे का?”

-“कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”

-उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल- अजित पवार