डोक्यात हेल्मेट बसत नाही; या माणसाला दंड करायचा कसा?, पोलिसांना गहन प्रश्न

अहमदाबाद : सध्या देशभरात वाहन धारकांमध्ये नव्या वाहतूक नियमांची मोठी दहशत आहे. नियम मोडायला नको असंच वाहन धारक म्हणताना दिसत आहेत. ट्राफिक पोलिसांचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर येत आहे. आता आणखी एक गोंधळ वाढवणारी घटना गुजरातमध्ये घडली आहे.

ट्राफीक पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या झाकीर मेमन नावाच्या एका वाहन चालकाला अडवलं. त्याला दंडही केला पण नंतर झाकीरचा प्रॉब्लेम ऐकून पोलिसांनाही प्रश्न पडला की याला दंड कसा करायचा.

झाकीरच्या डोक्याचा आकार मोठा असल्यानं त्याला हेल्मेट मिळत नाही. कोणत्याही बाजारात इतक्या मोठ्या आकाराचं हेल्मेट उपलब्ध नसल्यानं तो काहीच करू शकत नाही.

मी कायद्याचा आदर राखतो आणि नियमही पाळतो. हेल्मेटसाठी मी अनेक दुकानांमध्ये गेलो पण ते मिळालं नाही. गाडीची आवश्यक ती कागदपत्रं जवळ बाळगतो पण हेल्मेट नसतं. मी काहीच करू शकत नाही. मी त्याबद्दल पोलिसांनाही सांगितलं, असं झाकीरने सांगितलं आहे.

एक फळांचं दुकान चालवणाऱ्या झाकीरचं डोकं मोठं आहे. त्याबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही चिंता असते. त्याला नेहमीच सोबत जास्त पैसे बाळगावे लागत असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-