…तर अजुन कठोरात कठोर निर्णय घेऊ- मुख्यमंत्री

मुंबई | जीवनावश्यक वस्तू-औषधांची कमतरता नाही व लोकांची गर्दी होऊ नये म्हणून ती दुकानेही 24 तास सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. तरीही विनाकारण काही लोक बाहेर पडत आहेत. पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. दुकानांवर गर्दी कमी न झाल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरील थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला.

राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, मनसेप्रमुख राज ठाकरे हे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहोत असे सांगत ठाकरे यांनी त्या सर्वाचे आभार मानले.

इतर राज्यांतून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसत आहे. ते जिथे आहेत तेथेच थांबावे. महाराष्ट्र सरकारने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यांत अडकले असतील त्यांनी तिथेच राहावं, असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री साहाय्यता निधी-कोविड 19’ या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –

-“घरा बाहेर न पडता एकसंघता आणि संयमाच्या ‘बारामती पॅटर्न’चा राज्यासमोर आदर्श घालून देवूया”

-“विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही”

-कामगारास घरी परत जाण्यासाठी राज्याबाहेर जाऊ देऊ नका; केंद्राची राज्यांना सक्त ताकीद

-खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा- तुकाराम मुंढे

-धोक्याचा इशारा… रविवारी एकाच दिवशी तब्बल 22 कोरोनाग्रस्तांची नोंद