सोडून काँग्रेसचा हात, हार्दिक पटेल देणार का केजरीवालांना साथ?

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर ‘आम आदमी पक्ष’ इतर राज्यातही संघटनेला बळ देण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसची साथ सोडून ‘आप’च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

दिल्ली निवडणुकांनंतर हार्दिक पटेल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत फोटो शेअर करुन त्यांचं अभिनंदन केलं होतं. तेव्हापासून हार्दिक पटेल यांच्या ‘आप’प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं. परंतु हार्दिक पटेल काँग्रेससोबतच राहणार असल्याचं पाटिदार नेत्यांनी सांगितलं.

आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मार्चअखेरीस गुजरात दौरा करणार आहेत. त्यावेळी हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचा दावा त्यांची पत्नी किंजल यांनी ट्विटरवरुन केला होता. हार्दिक पटेल यांना 18 जानेवारीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं, तेव्हापासून ते घरी परतलेले नाहीत, असं किंजल यांनी लिहिलं होतं. हार्दिक पटेलांविरोधात 20 हून अधिक खटले सुरु आहेत. यापैकी दोन देशद्रोहाशी निगडीत आहेत. 2015 मध्ये त्यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व केल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

-ज्यांना शक्य आहे, त्यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी या; देवदर्शनात राजकारण करू नका- उद्धव ठाकरे

-“सामनातील भाषा आपली पितृभाषा आहे; ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही”

-संजय राऊत आमच्या घरचा माणूस, तर नरेंद्र मोदी मोठे बंधू- उध्दव ठाकरे

-विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर

-विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर