जुन्या गड्यावर, नवी जबाबदारी; हर्षवर्धन जाधवांना राज ठाकरेंकडून बक्षिस!

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नुकतेच घरवापसी केलेल्या हर्षवर्धन जाधव यांना राज ठाकरे यांनी बक्षिस दिलं आहे. ओरंगाबादच्या मनसे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलून हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. त्यानंतर त्यांनी आपला झेंडा बदलला तसंच अजेंड्यात देखील बदल केला. आता मनसे कात टाकण्याच्या तयारीत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांच्याकडे राज ठाकरेंनी मोठी जबादारी सोपवली आहे.

औरंगाबाद महापालिकेत संपूर्ण ताकदीनिशी उतरून महापालिकेवर मनसेचा भगवा फडकवण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी औरंगाबाद जिह्याचा दौरा देखील केला आहे.

दरम्यान, याच महिन्यात राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेत गद्दारांना माझ्या पक्षात स्थान नाही, दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी गौतम आमराव यांची औरंगाबाद जिल्ह्याच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती.

मनसेत नव्याने आलेले हर्षवर्धन जाधव आणि सुहास दशरथे यांना औरंगाबाद जिल्ह्याचं अध्यक्षपद सोपवून नवीन जबादारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

-“हिंदुत्ववादी शिवसेनेचा मुस्लिम आरक्षणाचा विचार दुर्भाग्यपूर्ण”

-पवारांना रामराम ठोकत हाती भगवा घेतलेल्या सचिन अहिरांवर सेनेने सोपवली मोठी जबाबदारी!

-जखम टोंगळ्याला अन् पट्टी मस्तकाला; कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

-तुमचे दात जास्तचं दिसताहेत… ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही- चित्रा वाघ

-महाराष्ट्रातलं वातावरण खराब झालंय… मला सुरक्षा द्या- अमोल मिटकरी