मनसेत इनकमिंग सुरू; दोन दिग्गज नेत्यांनी केला प्रवेश

मुंबई | मनसेने कात टाकत आपल्या पक्षाची भूमिका बदलत हिंदूत्वाची शाल पांघरी आहे. आपल्या पक्षाचा झेंडा बदलत पक्षाचा इरादाही बदलला. यादरम्यान मनसेला गुड न्युज मिळाली आहे. दोन दिग्गज नेत्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

राज ठाकरेंचे पुर्वीचे सहकारी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजप नेते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून या पुढील काळात काम करणार असल्याच्या भावना प्रकाश महाजन आणि हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत.

हर्षवर्धन जाधव यांनी गेल्या 1 महिन्यांपूर्वीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरेंची भेट ही महत्वाची मानली जात होती. याच भेटीत घरवापसीची चर्चा झाली होती.

दरम्यान, उद्या मनसेचा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत महामोर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मी महाराष्ट्राची लेकय; घाबरणारही नाही आणि गप्पही बसणार नाही- मानसी नाईक

-मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लाज वाटायला हवी- राजू शेट्टी

-मनसेत प्रवेश करताच जाधवांची गर्जना; ‘आता चंद्रकांत खैरे खासदार होणे नाही…!’

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

-साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर