आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंना केलंय हे आवाहन

मुंबई | देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे मिळून यावर मार्ग काढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत नुकतीच महत्वाची बैठक झाली. मलबार हिल येथील जेतवन या आरोग्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली.

निझमुद्दीनल जे कोणी गेले होते त्यांनी जवळच्या रुग्णालयाला भेट देऊन तपासणी करून प्रशासनाला मदत करावी. राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रशासनाला सर्व समाजाने सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 113 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 748 वर पोहोचली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“इस्लामपूरमधील चार रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”

-‘हल्दीराम’च्या मालकाचं निधन; कुटुंब अडकलं परदेशात

-ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी

-तेव्हा विचारलं ‘गो कोरोना’ म्हणून जाईल का? अन् आता सगळेच म्हणतात गो कोरोना- रामदास आठवले

-मरकज प्रकरणावरून शरद पवार यांची नाव न घेता अमित शहांवर टीका