राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई | मागिल काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार का? नागरिकांसाठी कोणते निर्बंध घातले जाणार का? अशा प्रकारचे सवाल नागरिकांकडून विचारले जात होते. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य केलं आहे.

नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही. त्यामुळे निर्बंध अधिक कठोर केले जातील. असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसेच राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असही टोपे म्हणाले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र त्या तुलनेत मृत्यूदर कमी असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यात कोरोनाबाधित होणाऱ्या 85 टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बऱ्याचजणांना गृहविलिगीकरणाचा सल्ला देण्यात आला असल्यामुळे राज्यात खाटांची कमतरता नसल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रीसूत्रानूसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. तसेच लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणरी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या नियमांचं स्वशिस्तीने पालन करावे.

लॉकडाऊन टाळण्यासाठी राजेश टोपे यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, वारंवार हात धुणे यासर्व नियमांचं लक्षपूर्वक पालन करण्याचं आवाहनही नागरिकांना दिलं आहे. राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबद्धपणे नियमांचे पालन करणे गेरजेचे आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणार नाही, असं मला वाटतं असल्याचं रोहित पावर यांनी सांगितलं आहे.

तसेच नागपूर शहरात कोरोना रुग्णांची वाढू लागल्यामुळे नाशिक शहरात आजपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

ताजमहालचं नाव आता राम महल होणार? भाजप नेत्याचा मोठा दावा