कुख्यात डॉन अरुण गवळीबाबत नागपूर न्यायालयाचा मोठा निर्णय!

नागपूर | कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे न्यायालयाने अरुण गवळीला पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सलग 2 वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

उच्च न्यायालयाने अरुण गवळीची यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबतची कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानेच अरुण गवळीला 24 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

दरम्यान,  अरुण गवळीला 24 मे रोजी नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे नागपुरला परत येणं शक्य नसल्याचं सांगत गवळीने न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र यावेळी न्यायालयाने गवळीचा अर्ज फेटाळून लावत पुढील 5 दिवसांमध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात हजर होण्याचा आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणारे- हसन मुश्रीफ

-पुण्यात आज 186 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, वाचा किती नवे रूग्ण मिळाले…

-‘महाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका’; भाजप नेत्याची प्रमोद सावंतांकडे मागणी

-पंढरीच्या वारीबद्दल मोठा निर्णय; अजित पवारांनी घेतली ‘ही’ ठाम भूमिका!

-राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकलं; मुख्यमंत्र्यांची आदरांजली