‘त्या’ हैवानालाही पेट्रोल टाकून जिवंत जाळा; पीडितेच्या आईची मागणी

नागपूर | वर्ध्यातल्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. माझ्या मुलीवर जसं त्याने पेट्रोल टाकलं तसं त्याच्यावरही पेट्रोल टाका आणि त्यालाही जिवंत जाळा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.

हिंगणघाट इथल्या महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणारा नराधम विकेश नगराळे याला अजूनही या घटनेचा पश्चाताप होत नाही, असं पोलिस सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे पीडितेच्या नातेईवाईकांध्ये संतापाचं वातावरण आहे.

काल झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंगणघाट येथे मोर्चा निघाला होता. यावेळी आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला योग्य शिक्षा देतो, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

दरम्यान, काल झालेल्या घटनेत प्राध्यापिका 40 टक्के भाजली आहे. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला आहे. तिला श्वसनाला देखील त्रास होतोय. कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

-केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआरसीबाबत केला मोठा खुलासा!

-दिलेला शब्द मी पाळणारच…. मार्चमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती करणार; उद्धव ठाकरेंचं वचन

-“तुम्ही काळजी करू नका, बुलेट ट्रेनमूळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नाही”

-मुख्यमंत्र्यांचा बाप काढल्याने शिवसेना आक्रमक; शेलारांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन

-‘या’ भाजप नेत्याने नोटबंदीवरून पंतप्रधानांवर उठवली टीकेची झोड