दारूची दुकाने उघडण्याची पंजाब सरकारची मागणी गृहमंत्रालयाने फेटाळली

नवी दिल्ली |  लॉकडाऊन असलेल्या अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू करण्यासाठी पंजाब सरकारने दारूची दुकाने सुरू व्हावीत यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होता. परंतू गृह मंत्रालयाने पंजाब सरकारची ही मागणी फेटाळून लावली आहे.

केंद्रिय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने उघडी ठेवण्याची पंजाब सरकारच्या विनंतीला लाल कंदिल दाखवला आहे. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “पंजाब सरकारने दारूची दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतू सद्य परिस्थितीचा सारासार विचार करून गृह मंत्रालयाने ही मागणी अमान्य केली आहे”.

गृह मंत्रालयाने 15 एप्रिलला काढलेल्या आदेशानुसार लॉकडाऊन काळात दारू, गुटखा, तंबाखूवरील विक्रीवर कडत प्रतिबंध आणले आहेत. लॉकडाऊन काळात ही  विक्री पूर्णपणे बंद राहील, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.

लॉकडाऊन काळात काही राज्यांचे मुख्यमंत्री दारू दुकाने उघडण्यासाठी परवानगी मागत आहेत. गुरूवारी महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महसूल सुरू होण्याकरिता राज्यातील दारू दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनानं आपल्याला संदेश दिलाय, आपल्या गरजा आपणच भागवल्या पाहिजेत- पंतप्रधान

-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र; केल्या ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

-जागतिक सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर घटला, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहीती

-हा अपघाताने पसरलेला विषाणू नाही तर हा अमेरिकेवर हल्ला; ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टीकेचा बाण

-पुस्तकं दुकाने, पंख्यांची दुकाने सुरू होणार तसंच मोबाईल रिचार्ज करता येणार