‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 9 वाजता संपूर्ण देशवासियांना मेणबत्या आणि दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी टीका केलेली असतानाच शिवसेनेनेही पंतप्रधानांच्या आवाहनाची खिल्ली उडवली आहे.

लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झाल, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करून ही खोचक टीका केली आहे. तसेच साहेब, कामाचं बोला आणि लोकांच्या पोटापाण्याचं बोला, असं आवाहनही संजय राऊत यांनी मोदींना केलं आहे.

रविवारी रात्री 9 वाजता तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे 9 मिनिटं करा, असं आवाहन मोदींनी आज देशवासियांना केलंय.

 

महत्वाच्या बातम्या –

-‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

-आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

-“लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने किमान वेतन द्या”

-#ये_आदमी_पागल_हो_चुका_है ; मोदींच्या आवाहनानंतर सोशल मीडियात ट्रेंड सुरु

-जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक 5 एप्रिलला करू नका- नरेंद्र मोदी