बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात कसा झाला?; ‘हे’ महत्त्वाचं कारण आलं समोर

नवी दिल्ली | चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा काल अपघात (Helicopter Accident) झाला. या भीषण अपघातात बिपीन रावत (Bipin Ravat) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे सध्या देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जनरल बिपीन रावत हे सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सैन्याच्या IAF MI 17 या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते तरीही त्यांचा अपघात झाला. यामुळे सुरक्षा यंत्रणेच्याही भुवया उंचावल्या.

जनरल बिपीन रावतसह आणखी 13 जण त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या अपघातात 14 पैकी 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकाॅप्टर कोसळले त्यामध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी, संरक्षण साहाय्यक, सुरक्षा कंमांडो तसेच आयएएफ पायलट यांच्यासोबत 13 लोक प्रवास करत होते.

जनरल बिपीन रावत (Bipin Ravat) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी समोर येत असून बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत आहे.

अशातच आता या दुर्घनटेमागील महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. CDS बिपीन रावत यांना घेऊन जात असताना हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातात कोणतीही तांत्रिक चूक किंवा कट नव्हता. खराब हवामानामुळे नियंत्रित फ्लाइट इनटू टेरेन (CFIT) स्थिती हे या घटनेचे मुख्य कारण समजतंय.

या दुर्घटनेबाबत खराब हवामान हे कारण असू शकते. त्याचवेळी तांत्रिक बिघाड आणि कट नाकारण्यात आला आहे. 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जात असताना ही घटना घडली होती.

दरम्यान, 2015 मध्ये बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला होता. ही घटना 3 फेब्रुवारी 2015 रोजी घडली होती. आता पुन्हा एकदा ही घटना घडली मात्र यावेळी बिपीन रावत यांचं निधन झालं.

बिपीन रावत यांची 2016 मध्ये सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिपीन रावत हे देशातील पहिले सीडीएस आहेत. नागालॅंड येथील दिमापूर येथील लष्कराच्या तीन कॉपर्स मुख्यालयाचे प्रमुख होते. त्यावेळी बिपीन रावत यांनी चित्ता हेलिकाॅप्टर दिमापूर सोडलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Omicron ला रोखण्यासाठी ‘हे’ औषध प्रभावशाली; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार?, एका दिवसात आढळले तब्बल ‘इतके’ रूग्ण

मनी हाईस्टच्या ‘स्टाॅकहोम’ने घरी लावली गणपतीची पेंटिंग; फोटो तुफान व्हायरल

पालकांनो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये ओमिक्राॅनची ‘ही’ लक्षणं दिसतात

चिंताजनक! फक्त 2 दिवसात नव्या रूग्णसंख्येत दुप्पटीने वाढ; वाचा आकडेवारी