“राज्याचा सातबारा काय एकट्या शरद पवारांच्या नावावर आहे का?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत भाजपवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना तसेच शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. तसेच यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

संजय राऊत हे बाळासाहेबांचं काम विसरले आहेत. अल्टीमेटम हा बाळासाहेबांकडून दिला जात होता. मात्र संजय राऊत नुसतेच बोलतात, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे.

संजय राऊत कोण आहेत?, त्यांचा जीव किती बोलतात किती?, असा खोचक सवाल प्रवीण दरेकरांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, असंही  प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे सर्व गोष्टी शांततेत करत आहेत. राज ठाकरे यांनी आज एक पाऊल मागे घेतलं आहे. याचा अर्थ त्यांनी माघार घेतली असा होत नाही, असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी चार पाऊल पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतलं आहे, असं प्रवीण दरेकरत म्हणाले आहेत.

शरद पवारांचे योगदान नाकारता येत नाही. मात्र राज्याचा सातबारा काय एकट्या शरद पवारांच्या नावावर आहे का?, बाकी कोणीचं नाही का?, असे सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केले आहेत.

शरद पवारांचा अपमान संपुर्ण राज्याचा अपमान कसा होई शकतो?, असा सवाल त्यांनी केला आहे. अगोदर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी या भ्रमातून बाहेर पडावे, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंच्या अल्टीमेटमबाबत बोलतांना संजय राऊतांनी खडेबोल सुनावले आहेत. कायद्याचं राज्य असल्यामुळे अल्टीमेटमवर निर्णय घेतला जात नाही. या राज्यातील गृहखात आणि सरकार सक्षम आहे. त्यामुळे कोणी वाद निर्माण केला तरी फरक पडत नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वांत मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

राज्यातील सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! 

मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं 

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना अटक होणार?, महत्त्वाची माहिती समोर 

काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर