“अरे तुझा पगार किती तू बोलतो किती, आज वाढदिवस आहे म्हणून ‘टग्या’ म्हणणार नाही”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. मात्र, राज्य सरकार कामगारांच्या मागण्यांना नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशातच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

अजित पवार संवेदनशील व्यक्ती आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत . त्यांना गोरगरिबांची जाण आहे. त्यांनी साडेबाराशे कोटी देण्याचं मान्य देखील केलं होतं, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

पण माझी अजित पवारांना विनंती आहे की, तुम्ही प्रकरण इतकीही ताणू नका. या गोरगरिब कामगारांना पगार मिळेल, त्यांना न्याय मिळेल, त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचं वेतन मिळेल तेवढी कृपा करावी, अशी विनंती प्रसाद लाड यांनी केली आहे.

संप ताणायचा नसेल तर त्याला चर्चा हा तोडगा आहे. आम्ही कोणाचं नुकसान करू इच्छित नाही, ना कामगारांचं ना सरकारचं, त्यामुळे आमचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने भजन कीर्तन करत चालू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

हेच आंदोलन आम्ही संघर्षपुर्ण मार्गाने केलं असतं तर महाराष्ट्र बंद पडायला 5 मिनिटं लागली नसती. अनिल परब यांच्या नेतृत्वात काही होत नाहीये. आमची विनंती आहे की अजित पवारांनी बैठक घ्यावी आणि याचा तोडगा काढावा, अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे.

संजय राऊतांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे मी त्यांना उलटं बोलणार नाही. त्यांना मी शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या दिवशी तरी खोटं बोलून पाप करू नको, असं म्हणत प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना चिमटे घेतले आहेत.

एकादशीच्या दिवशी कामगारांचा आणि वारकऱ्यांचा आशीर्वाद घे, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.मागण्या पुर्ण होत नाहीत, तोपर्यंत सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत राहू, असंही लाड म्हणाले.

संजय राऊत म्हणातात की आहे त्या पगारात समाधान माना, अरे तुझा सामनाचा पगार किती तु बोलतो किती, आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याला टग्या बोलत नाही, असा खोचक टोला देखील प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

त्याला काय माहिती कामगारांचा प्रश्न. माझ्या कामगारांची दिवाळी झाली नाही. त्यांना पगार नाही, असंही लाड म्हणाले. अनिल परब म्हणतो, डीए देणार नाही. अरे तु काय तुझ्या बापाचे पैसे देतो काय तू, अशी एकेरी भाषेत टोला देखील त्यांनी लगावला आहे.

आमचा डीए आम्ही घेणार, फेस्टीवल बोनस आम्ही घेणार. तुम्हाला 14 नाहीतर 40 हजार रूपये पगार दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

तुम्हाला गरज लागली तर मला आमि प्रविण भाऊला बोलवा, आम्ही मुंबईतच आहोत, संताजी आणि धनाजी आले म्हटलं की घाबरतात, असंही लाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, घाऊक बाजारात महागाईचा कहर

‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला

  ‘…म्हणून राज्यात इंधन दर कमी होणार नाही’; अजित पवारांनी सांगितलं कारण

  ‘पुन्हा गुजरात कनेक्शन’; नवाब मलिकांच्या नव्या ट्विटनं खळबळ

  ‘जोपर्यंत कंगना नाक घासून माफी मागत नाही, तोपर्यंत तिला…’; ‘या’ मंत्र्याचा कंगनावर हल्लाबोल