बायको अन् भावाची धारदार कुऱ्हाडीने केली हत्या; आईने मध्यस्थी केली तर तिच्यावरही हल्ला!

लखनऊ |  सोमवारी उत्तर प्रदेशातल्या नौरंगाबादमध्ये एका व्यक्तीने बायको आणि भावाची धारदार कुऱ्हाडीने हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या क्रुर आरोपीचं नाव शकिल असं नाव आहे.

शकिलने आपली पत्नी शबीकुन्निसा आणि लहान भाऊ मोहसीनची हत्या केली. जेव्हा शकिलच्या आईने शकीलला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने आईवरही हल्ला करुन तिला जखमी केलं.

शकिलच्या शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शकिलला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. तर त्याने हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे.

दरम्यान, शकिलचा हत्या करण्याचा उद्देश काय होता, याचा पोलिस कसून तपास करत आहेत. तर शकिलच्या आईवर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-नागपुरात 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार…. नंतर गुप्तांगात रॉड टाकून अत्याचार!

-“RSS दहशतवादी संघटना असल्याचे माझ्याकडे पुरावे”

-उदयनराजेंविरोधातील मारहाण-खंडणी प्रकरणी सातारा न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

‘ठाकरे सरकार म्हणजे मल्टीस्टार सिनेमा’, तुम्हाला काय वाटतं??; अजित पवारांचं भन्नाट उत्तर

-प्रजासत्ताकदिनी काँग्रेसने पाठवलेली ‘ही’ खास भेट पंतप्रधान मोदींनी नाकारली!