“शिवसेनेनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलं हे योग्य नाही”

नवी दिल्ली | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झालं. काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले असल्याचं दिसत आहे.

शिवसेनेनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलं हे योग्य नाही, असं काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी अलिप्त राहू शकली असती. आम्ही या विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं. मात्र त्यांनी या विधेयकाच्या बाजूने का मतदान केलं हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिली आहे.

दरम्यान, देशामध्ये बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवण्याऐवजी भाजप समजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप दलवाई यांनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे समाजाला धरुन नाही, असंही दलवाई यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-