“मॅचपूर्वी मी सेक्स करायचो, त्यामुळे मैदानात उतरल्यावर मला…”

मुंबई | फुटबाॅल हा सध्या जगभर प्रचंड लोकप्रिय खेळ मानला जातो. अनेक देशांमध्ये फुटबाॅल खेळणारे खेळाडू आहेत. परिणामी जगात फुटबाॅलला एक वेगळं वलय आहे.

फुटबाॅलच्या मैदानात खेळाडू आपल्या कामगिरीनं जगाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतात. परिणामी जगभरात खेळाडूंना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असते.

फुटबाॅल एक लोकप्रिय खेळ असण्यासोबतच एक श्रीमंत खेळ म्हणून देखील सध्या जगभर प्रसिद्ध आहे. सध्या एक माजी फुटबॉल खेळाडू (Football Player) जोरदार चर्चेत आहे.

ब्राझीलचा (Brazil) महान निवृत्त फुटबॉल खेळाडू रोमारियो (Romario) याने एका लेखात वैयक्तिक आयुष्यातले (Personal Life) काही खुलासे केले असून, त्यामुळे तो जोरदार चर्चेत आहे.

सध्या तो त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान असणाऱ्या एका एन्फ्ल्युएन्सरला डेट (Date) करतोय. फुटबॉल मॅचपूर्वी मी पत्नीशी सेक्स करायचो. त्यामुळे मैदानात उतरल्यावर मला शांत आणि हलकं वाटायचं, असा खुलासा रोमारियोने केला आहे.

फुटबॉल सोडल्यानंतर रोमारियो ब्राझीलमध्ये राजकारणात सक्रिय आहे. 56 वर्षांचा रोमारियो सध्या त्याच्यापेक्षा खूप लहान तरुणीला डेट करतोय. या प्रेमी युगलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

मार्सेले सिओलिन (Marcelle Ceolin) असं रोमारियोच्या प्रेयसीचं नाव आहे. मार्सेले 31 वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी रोमारियोने गर्लफ्रेंडच्या हातात हात घातलेला फोटो शेअर केला होता. त्यानंतर ते दोघं एका रॅप फेस्टिव्हलमध्ये दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…