तरुण मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार देत असेल तर…; जाणून घ्या ही 5 कारणं

मुंबई | मुलं मोठी होऊ लागली की पालकांना मुलांचं करियर, नोकरी आणि लग्न या गोष्टींची चिंता सतत सतावत असते. मुलं वयात आली की पालक त्यांच्यासाठी नाते शोधू लागतात.

काही वर्षापूर्वी 20 ते 24 वयोगटात लग्न उरकण्याची परंपरा होती. त्यानंतर हळूहळू वयोमर्यादा वाढू लागली. मागील 2 ते 3 वर्षापासून वयोगटात वाढ झाल्याचं दिसून येतंय.

अशातच काळानुसार तरुणांमध्ये लग्नाची फारशी क्रेझ असल्याचं दिसत नाहीये. आजच्या युगात बहुतेक लोक लग्नाला प्राधान्य देत नाहीत. पालक जेव्हा मुलांशी लग्नाबाबत बोलतात तेव्हा ते एकतर लग्नाला स्पष्ट नकार देतात.

तर काहीजण अजून लग्न करायचं नाही, असं सांगून प्रकरण टाळण्याचा प्रयत्न करतात. पालकांसाठी मुलांचं लग्न म्हणजे सगळं काही सेट झाल्यात जमा असतं. मात्र, मुलं किंवा मुली लग्नासाठी तयार नसतात.

तरुण मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार देत असेल तर त्यामागील कारण शोधणं देखील महत्त्वाचं आहे. मुलांना किंवा मुलींना पालकांनी जवळ बसवून विचारपूस केली तर मुलं मोकळेपणाने व्यक्त होताना दिसतात.

स्वातंत्र्य संपुष्टात येण्याच्या भीतीमुळे मुले किंवा मुली कोणत्याही बंधनात बांधू इच्छित नाहीत. आयुष्यात होणार बदल स्विकारण्यास ते तयार नसतात. मुलींच्या बाबतीत ही गोष्ट मुख्यत्वे लागू होते.

जर एखादा मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार देत असेल तर त्याचे एक कारण त्यांचे जुने रिलेशनशीप असू शकतं. अनेक मुलं-मुली लग्नाआधी कुणासोबत रिलेशनशीपमध्ये असतात. मात्र, घरच्यांचा विरोध होईल, या भीतीने मुलं आपलं मत व्यक्त करत नाहीत.

लग्नानंतर जबाबदारीचं फार मोठं ओझं असतं असं म्हणतात. अनेक मुले किंवा मुली जबाबदारी सांभाळण्यासाठी घाबरतात. कोणताही ताण नसलेलं आयुष्य जगत असताना अचानक जबाबदारी येणार असल्याने लग्नासाठी अनेकजण टाळाटाळ करतात.

अनेकदा पालकांची भांडण पाहून मुलांमध्ये भीती निर्माण होते. त्यामुळं लग्न करावं की नाही, असा प्रश्न पडायला लागतो. त्यामुळे लहानपणाची भीती तरुण वयात देखील कायम राहते. त्यावेळी पालकांनी समजूत काढणं गरजेचं असतं.

दरम्यान, काही मुले आणि मुलींना लग्नानंतरच्या शारिरिक संबंधाची देखील भीती वाटायला लागते. लहानपणी घडलेल्या एखाद्या घटनेमुळे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार होतं. त्यावर देखील पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

अजित पवारांच्या मागणीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, “केंद्रानं रात्री 12 वाजताच…”

 “मुख्यमंत्र्यांनी त्वरित निर्णय घ्यावा नाहीतर…”; गोपीचंद पडळकरांचा सरकारला थेट इशारा

“मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द”, संजय राऊतांचा हल्लाबोल

भारतात फिरू नका, बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत- जो बायडन

“हे सरकारी ऑफिस आहे, कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये”