“शिवसेना-भाजप युती अभेद्य पण; युती तुटली तर….”

मुंबई : नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असेल, असं वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केलं आहे. तसेच लाड यांनी ते रत्नागिरीतून लढण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. त्यासाठी सध्या रत्नागिरी चिपळून विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी चाचपणी सुरु आहे.

विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे. पण युती तुटली तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणूकीच्यावेळी जागावाटपासाठी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात आधीच बोलणी झाली असताना, आता पुन्हा या मुद्द्यावरुन युती तुटते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांपुर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बाबत काही संकेतही दिले होते. गेल्या निवडणुकांचा निकाल लक्षात घेता भाजपचे 122 आमदार, अपक्षांचे समर्थन आणि इतर पक्षातून आलेले आमदार यांची संख्या लक्षात घेता भाजपचं संख्याबळ 132 आमदारांचे आहे. त्यामुळे 135 जागांवर समाधान मानणं भाजपसाठी अशक्य आहे. मुख्य म्हणजे याची जाणीव शिवसेनेलासुद्धा आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यंदा शक्य नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

दरम्यान, आता शिवसेना-भाजप युतीचं नेमकं काय होतयं याच्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-