मुंबई | ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. भाजपाशासित राज्यांमध्ये काश्मीर फाईल्स करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून वक्तव्य केलं आहे.
द काश्मीर फाईल्स हा एक चित्रपट आहे. जेव्हा हे सर्व सुरू होतं त्यावेळेस तेव्हा त्यांच्यासोबत एकचं व्यक्ती उभा होता. आजही आम्ही जिथे जिथे जातो तिथे काश्मीरी पंडित भाऊ बहिण यांना भेटतो.
शिक्षण असुदे नाहीतर इतर कोणतही क्षेत्र असूदे ते आता खूप पुढे गेलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की, चित्रपटापलीकडे आज काश्मीर, जम्मू आणि लडाख याठिकाणी काय होत आहे, हे महत्त्वाचं आहे.
आपण देशाला कशाप्रकारे पुढे नेऊ शकतो, यासंदर्भात चर्चा व्हायला हवी, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी चित्रपटाच्या कमाईबाबत वक्तव्य केलं आहे.
जर द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या कमाईतून कश्मिरी पंडितांच्या भविष्याकरिता काही होणार असेल तर प्रत्येकजण त्यामध्ये हातभार लावू शकतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
द काश्मीर फाईल्ससारखे चित्रपट करमुक्त करण्याची काही गरज नाही. लोक स्वत: पैसे खर्च करून हा चित्रपट पाहतात. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे, त्याचा ते वापर करत आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
मला वाटतं की, एखादी कला, संस्कृती ही त्या जागी असायला हवी. त्याचा मान आपण नक्की ठेवायला हवा. त्यागोष्टीचं कौतुक नक्कीचं व्हायला हवे. मात्र, सत्य परिस्थिती काय आहे, इतिहास आणि भविष्य याविषयी चर्चा व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशभरात द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून काश्मीर फाईल्स चित्रपटाचं समर्थन करण्यात येत आहे. तर देशातील काही पक्षांकडून विरोध देखील करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत”
“काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”
“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”
‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा
“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं”