एक मिनिटासाठी श्वास रोखून धरता येत असेल तर तुम्हाला कोरोना नाही- रामदेव बाबा

नवी दिल्ली | कुठलीही व्यक्ती एक मिनिटासाठी श्वास रोखून धरत असेल तर याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची बाधा झालेली नाही असा होतो, असा दावा प्रसिद्ध योगगुरु रामदेव बाबा यांनी  केलाय.

कोरोना व्हायरससाठी विशेष प्राणायाम असून त्याला उज्जायी म्हटलं जातं, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे. त्यांनी तो प्राणायामचा प्रकार करुनही दाखवला.

ज्या व्यक्तींना हायपरटेंशन, ह्दयाचा आजार, डायबिटीस आहे त्यांनी 30 सेकंदासाठी आणि तरुणांनी एक मिनिटासाठी श्वास रोखून धरला तर याचा अर्थ तुम्हाला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. तुम्ही हा प्रयोग करुन बघू शकता, असं रामदेव बाबा म्हणाले.

दरम्यान, रामदेव बाबांनी आणखी एक उपाय सांगितला. तुम्ही राईचे तेल तुमच्या नाकपुडयांमध्ये टाकले तर कोरोना व्हायरस वाहून खाली तुमच्या पोटामध्ये जाईल. तिथे असणाऱ्या अॅसिडमुळे त्याचा मृत्यू होईल, असा दावा बाबा रामदेव यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

-“राज ठाकरे यांची सूचना वास्तविक आणि राजकारणापलीकडची”

-उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यास राज्यपालांना कोणतीच अडचण नाही; कारण…

-गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

-लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

-सपना चौधरीनं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, तुमच्या सर्वांची खूप आठवण येतेय!