पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागांतील वीजपुरवठा उद्या बंद राहणार

पुणे | सध्या उन्हामुळे सर्वांनाच घामाघूम केलं आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस बसत असल्याचं पहायला मिळतंय. लाईट गेल्यावर तर अंगाची लाही लाही होते. अशातच पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अतिउच्च दाब टॉवर लाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यातील काही भागातील वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या 132 केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनच्या दुरुस्तीचं काम होणार आहे.

त्यामुळे नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या महत्त्वाच्या परिसरातील वीजपुरवठा सोमवारी पहाटे चार ते सकाळी सहा वाजेदरम्यान बंद राहणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी देखील घेतली जात आहे.

गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाउसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पिटल परिसर, विमाननगर, रोहन मिथिला सोसायटी, या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, या भागात देखील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाउसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी, या एरियांचा देखील यात समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ गाण्यावर खडसे-सोमय्यांची धमाकेदार एन्ट्री; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात; तातडीने रूग्णालयात हलवलं

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर; भव्य सत्कार करणार

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘तुम्हाला बजावून सांगतोय की…’; अमित शहांवर प्रकाश राज भडकले